Posts

Showing posts from September, 2022

प्रश्नमंजुषा स्पर्धा ( Prashnamanjusha )

Image
कन्या शाळेत केंद्रस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न कन्या शाळेचे मधुमती गलांडे व प्रशिक वाघमारे प्रथम क्रमांकाचे बक्षीस स्विकारताना धर्माबाद :- येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत रत्नाळी केंद्रांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांची प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली.  मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्यात रत्नाळी केंद्रातील कन्या शाळेसह रत्नाळी, पाटोदा बु. पाटोदा खु. मंगनाळी, अतकूर, बाभळी, शेळगाव थडी आणि बन्नाळी असे एकूण 09 शाळांच्या इयत्ता पाचवी ते सातवीचे प्रत्येकी दोन-दोन विद्यार्थी सहभागी झाले होते.  यावेळी केंद्राचे केंद्रप्रमुख आबासाहेब उस्केलवर, कन्या शाळा धर्माबादचे मु. अ. सी. एच. सय्यद, श्रीमती एस. ए. खेडकर, सौ. एम. डी. जोशी, सौ. मंगला वास्टर, सौ. गुंडाळे मॅडम, माधव हिमगिरे, एजाज सय्यद, बी. एम. वडजे, बी. टी. कदम, आर. एस. इंदुरकर, एस. एस. कामिनवार, एल. एन. गुडलावार या शिक्षकांची उपस्थिती होती. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात कन्या शाळेच्या मैदानावर ही प...

School Day at Kanya Shala Dharmabad

Image
आम्ही चालवू आमची शाळा उपक्रमांतर्गत स्वयंशासन दिन साजरा धर्माबाद :- येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत आज दि.5 सप्टेबर रोजी भारताचे दुसरे राष्ट्रपती व शिक्षणतज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षकदिना निमित्त  आम्ही चालवू आमची शाळा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील सातवी इयत्तेतील विद्यार्थ्यांनी दिवसभर अध्यापन व शाळानियंत्रणाचे उत्कृष्ट कामकाज पाहिले. स्वयंशासन दिनाच्या निमित्ताने किशोर शेळके मुख्याध्यापक, कु. सुजाता डुमणे उपमुख्याध्यापक, सुमेध भेरजे सेवक, इतर विद्यार्थ्यांसह दिव्यांग विद्यार्थिनी सृष्टी उपरे देखील शिक्षकांच्या भूमिकेत काम पाहिले. याप्रसंगी सेवानिवृत्त पदोन्नत मुख्याध्यापक श्री शेषेराव माडेवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि 61 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. स्वयंशासन दिनात सर्वोत्कृष्ट अध्यापन करणाऱ्या प्रथम सुजाता डुमणे, द्वितीय कैलास चंदन व दिव्या येवतीवाड तृतीय क्रमांक या शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्यांची निवड येथील शिक्षिका श्रीमती एस. ए. खेडकर, सौ. सय्यद सी. एच...