School Day at Kanya Shala Dharmabad
आम्ही चालवू आमची शाळा उपक्रमांतर्गत स्वयंशासन दिन साजरा
धर्माबाद :- येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत आज दि.5 सप्टेबर रोजी भारताचे दुसरे राष्ट्रपती व शिक्षणतज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षकदिना निमित्त आम्ही चालवू आमची शाळा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी शाळेतील सातवी इयत्तेतील विद्यार्थ्यांनी दिवसभर अध्यापन व शाळानियंत्रणाचे उत्कृष्ट कामकाज पाहिले. स्वयंशासन दिनाच्या निमित्ताने किशोर शेळके मुख्याध्यापक, कु. सुजाता डुमणे उपमुख्याध्यापक, सुमेध भेरजे सेवक, इतर विद्यार्थ्यांसह दिव्यांग विद्यार्थिनी सृष्टी उपरे देखील शिक्षकांच्या भूमिकेत काम पाहिले.
याप्रसंगी सेवानिवृत्त पदोन्नत मुख्याध्यापक श्री शेषेराव माडेवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि 61 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. स्वयंशासन दिनात सर्वोत्कृष्ट अध्यापन करणाऱ्या प्रथम सुजाता डुमणे, द्वितीय कैलास चंदन व दिव्या येवतीवाड तृतीय क्रमांक या शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्यांची निवड येथील शिक्षिका श्रीमती एस. ए. खेडकर, सौ. सय्यद सी. एच. आणि सय्यद एजाज यांनी केले. इयत्ता सातवी वर्गाचे वर्गशिक्षक एम. एन. हिमगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रभारी मुख्याध्यापक नासा येवतीकर यांच्या सनियंत्रणाखाली सदरील स्कुल डे उत्साहात व आनंदात पार पडले.
स्कुल डेमध्ये परिपाठ सादर करतांना विद्यार्थीस्कुल डे मध्ये सहभागी विद्यार्थी
स्कुल डे निमित्ताने शापोआ मध्ये विद्यार्थ्यांना जिलेबी देण्यात आलीआजच्या स्कुल डे चे मुख्याध्यापक किशोर शेळके मनोगत व्यक्त करतांनाआजच्या स्कुल डे च्या मुख्याध्यापिका सुजाता डुमणे मनोगत व्यक्त करतांना
Comments
Post a Comment