उतारा वाचन व प्रश्नोत्तर ( 01 )
उतारा वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
( इयत्ता 5 वी ते 7 वी साठी )
होळीचा दिवस उजाडला. आमश्या सकाळपासूनच होळीजवळ ढोल घेऊन बसला होता. हळूहळू त्याने ढोलावर थाप मारायला सुरुवात केली. गावातील स्त्री-पुरुष, पोरेबाळे ढोलाच्या दिशेने येऊ लागली. नकळत नाचाला सुरुवात झाली. सर्वजण एकमेकांचा हात धरून बेधुंदपणे नाचत होते. आमश्या मोठ्या रंगात येऊन ढोल वाजवत होता. बघता बघता लहान- सहान, थोरामोठ्यांनीही आमश्याच्या भोवती रिंगण धरले. नाचाच्या चाली बदलत, तहानभूक विसरून सर्वजण ढोलाभोवती नाचू लागले. नाच रंगात येता येता रात्र केव्हा झाली ते समजलेही नाही. पेटत्या होळीच्या भोवती पुन्हा नाच सुरू झाला.
1. आमश्या ढोल घेऊन कोठे बसला होता ?
--------- होळीजवळ
2. सर्वजण बेधुंदपणे का नाचत होती ?
-------- ढोलचा आवाज ऐकून
3. लोकांना नाचताना काय समजले नाही ?
------- रात्र कधी झाली हे समजले नाही.
4. समानार्थी शब्द लिहा
सकाळ = पहाट, प्रभात, अरुणोदय
नाच = नृत्य
5. विरुद्धार्थी शब्द लिहा
विसरणे × आठवणे
सुरुवात × शेवट
6. आमश्या मोठ्या रंगात येऊन ढोल वाजवत होता.
( आमश्या ऐवजी सुधा चा वापर करून वाक्य पुन्हा लिही )
----- सुधा मोठ्या रंगात येऊन ढोल वाजवित होती.
नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद
Comments
Post a Comment