Posts

उतारा वाचन व प्रश्नोत्तर ( 01 )

 उतारा वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा ( इयत्ता 5 वी ते 7 वी साठी ) होळीचा दिवस उजाडला. आमश्या सकाळपासूनच होळीजवळ ढोल घेऊन बसला होता. हळूहळू त्याने ढोलावर थाप मारायला सुरुवात केली. गावातील स्त्री-पुरुष, पोरेबाळे ढोलाच्या दिशेने येऊ लागली. नकळत नाचाला सुरुवात झाली. सर्वजण एकमेकांचा हात धरून बेधुंदपणे नाचत होते. आमश्या मोठ्या रंगात येऊन ढोल वाजवत होता. बघता बघता लहान- सहान, थोरामोठ्यांनीही आमश्याच्या भोवती रिंगण धरले. नाचाच्या चाली बदलत, तहानभूक विसरून सर्वजण ढोलाभोवती नाचू लागले. नाच रंगात येता येता रात्र केव्हा झाली ते समजलेही नाही. पेटत्या होळीच्या भोवती पुन्हा नाच सुरू झाला. 1. आमश्या ढोल घेऊन कोठे बसला होता ?  --------- होळीजवळ 2. सर्वजण बेधुंदपणे का नाचत होती ? -------- ढोलचा आवाज ऐकून 3. लोकांना नाचताना काय समजले नाही ?  ------- रात्र कधी झाली हे समजले नाही. 4. समानार्थी शब्द लिहा सकाळ = पहाट, प्रभात, अरुणोदय नाच = नृत्य 5. विरुद्धार्थी शब्द लिहा विसरणे × आठवणे सुरुवात × शेवट 6. आमश्या मोठ्या रंगात येऊन ढोल वाजवत होता.  ( आमश्या ऐवजी सुधा चा वापर करून वाक्य प...

शैक्षणिक सहल ( Shaikshanik Sahal - 2023 )

Image
जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा धर्माबादची आज दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी शैक्षणिक सहल काढण्यात आली. त्यात श्रीदासगणू प्रतिष्ठान गोरठा, ता. उमरी शितलादेवी पोचम्मा मंदीर, बारड ता. मुदखेड बारड येथे सहभोजनाचा आनंद घेतांना श्री सत्य गणपती देवस्थान, दाभड ता. भोकर हुजूरसाहिब गुरुद्वारा, नांदेड श्रीक्षेत्र काळेश्वर मंदीर, विष्णूपुरी नांदेड  येथे भेट देण्यात आली. या सहलीत सहभागी विद्यार्थी वर्ग सातवा -  सुजाता उत्तम डुमणे शिवानी विलास आंबेवार दिव्या राजीव येवतीवाड संजीवनी मिलिंद शिंदे संध्या श्याम पवार शीतल सिद्धार्थ कदम चंदन कैलास शंकर कपिल माधवराव शिवशेट्टे शंतनू कन्हैय्या मंतोड सुमेध रमेश भेरजे वर्ग सहावा -  नैयनश्री विठ्ठल तिप्रेसवार साक्षी श्रीनिवास गायनवाड विराज विश्वनाथ मोरे वर्ग पाचवा मधुमती प्रभाकर गलांडे इशिता दिलीप तायडे स्वाती गौतम मिसाळे ऋषिकेश संजय निदाने प्रशिक निर्वाण वाघमारे अजित चंद्रकांत गाडेकर परमेश्वर व्यंकटेश बेंडके वर्ग चौथ...

प्रश्नमंजुषा स्पर्धा ( Prashnamanjusha )

Image
कन्या शाळेत केंद्रस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न कन्या शाळेचे मधुमती गलांडे व प्रशिक वाघमारे प्रथम क्रमांकाचे बक्षीस स्विकारताना धर्माबाद :- येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत रत्नाळी केंद्रांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांची प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली.  मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्यात रत्नाळी केंद्रातील कन्या शाळेसह रत्नाळी, पाटोदा बु. पाटोदा खु. मंगनाळी, अतकूर, बाभळी, शेळगाव थडी आणि बन्नाळी असे एकूण 09 शाळांच्या इयत्ता पाचवी ते सातवीचे प्रत्येकी दोन-दोन विद्यार्थी सहभागी झाले होते.  यावेळी केंद्राचे केंद्रप्रमुख आबासाहेब उस्केलवर, कन्या शाळा धर्माबादचे मु. अ. सी. एच. सय्यद, श्रीमती एस. ए. खेडकर, सौ. एम. डी. जोशी, सौ. मंगला वास्टर, सौ. गुंडाळे मॅडम, माधव हिमगिरे, एजाज सय्यद, बी. एम. वडजे, बी. टी. कदम, आर. एस. इंदुरकर, एस. एस. कामिनवार, एल. एन. गुडलावार या शिक्षकांची उपस्थिती होती. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात कन्या शाळेच्या मैदानावर ही प...

School Day at Kanya Shala Dharmabad

Image
आम्ही चालवू आमची शाळा उपक्रमांतर्गत स्वयंशासन दिन साजरा धर्माबाद :- येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत आज दि.5 सप्टेबर रोजी भारताचे दुसरे राष्ट्रपती व शिक्षणतज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षकदिना निमित्त  आम्ही चालवू आमची शाळा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील सातवी इयत्तेतील विद्यार्थ्यांनी दिवसभर अध्यापन व शाळानियंत्रणाचे उत्कृष्ट कामकाज पाहिले. स्वयंशासन दिनाच्या निमित्ताने किशोर शेळके मुख्याध्यापक, कु. सुजाता डुमणे उपमुख्याध्यापक, सुमेध भेरजे सेवक, इतर विद्यार्थ्यांसह दिव्यांग विद्यार्थिनी सृष्टी उपरे देखील शिक्षकांच्या भूमिकेत काम पाहिले. याप्रसंगी सेवानिवृत्त पदोन्नत मुख्याध्यापक श्री शेषेराव माडेवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि 61 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. स्वयंशासन दिनात सर्वोत्कृष्ट अध्यापन करणाऱ्या प्रथम सुजाता डुमणे, द्वितीय कैलास चंदन व दिव्या येवतीवाड तृतीय क्रमांक या शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्यांची निवड येथील शिक्षिका श्रीमती एस. ए. खेडकर, सौ. सय्यद सी. एच...

Sub - English

*✍🏼 Develop Reading - Writing Skill 📘* *~~~~~~~~~~~~~~* *class - 5th    Sub - English* -------------------------------- Read & Wirte Given Words Three Times ( दिलेले शब्द तीन वेळा वाचा व लिहा ) *good - गुड - चांगला* *morning - मॉर्निंग - सकाळ* *best - बेस्ट - चांगला* *how - हाऊ - कसा* *fine - फाईन - चांगला* *happy - हॅपी - आनंदी* *time - टाईम - वेळ* *Read Page No. 6* -------------------------------- *Edit - Write* - Na Sa Yeotikar, Subject Teacher, Girl's School, Dharmabad *✍🏼 Develop Reading - Writing Skill 📘* *~~~~~~~~~~~~~~* *class - 6th    Sub - English* -------------------------------- Read & Wirte Given Words Three Times ( दिलेले शब्द तीन वेळा वाचा व लिहा ) *when - व्हेन - जेव्हा* *show - शो - दाखवा* *hand - हॅन्ड - हात* *know - नो - माहीत* *want - वॉन्ट - पाहिजे* *happy - हॅपी - आनंदी* *really - रियली - खरंच* *close - क्लोज - बंद* *shadow - शॅडो - सावली* *smile - स्माईल - हसणे* *Read Page No. 1* -------------------------------- *Edit - Write* - Na ...

Sub - Marathi

*✍🏼 लेखन - वाचन विकास उपक्रम 📘* *~~~~~~~~~~~~~~* *वर्ग - पाचवा    विषय - मराठी* -------------------------------- खालील शब्द वाचा आणि  वहीत तीन वेळा लिहा  *कष्टाळू, स्वभाव, सगळ्या, संध्याकाळी, कट्ट्यावर, चक्कर, दिनक्रम, वर्षी, कॉलेज, माज्या, पडल्यात, कोनाड्यात, दुरुस्त* *पान क्र. दोन व तीनचे वाचन करावे* -------------------------------- *संकलन व लेखन* - नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद *✍🏼 लेखन - वाचन विकास उपक्रम 📘* *~~~~~~~~~~~~~~* *वर्ग - सहावा    विषय - मराठी* -------------------------------- खालील शब्द वाचा आणि  वहीत तीन वेळा लिहा  *जन्म, फ्रान्स, सिव्हर्क, जन्मदाते, लॉसन, बॉईड, डनलॉप, वर्षे, प्रचार, प्रसार, मोठ्या, प्रमाणात, आपल्या, खेळण्यातला, शक्यता, मात्र, तुम्हाला, आत्मविश्वास* *पान क्र. दोन वरील उताऱ्याचे वाचन करावे* -------------------------------- *संकलन व लेखन* - नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद *✍🏼 लेखन - वाचन विकास उपक्रम 📘* *~~~~~~~~~~~~~~* *वर्ग - सातवा    विषय - मराठी* ------------------...

Welcome post

 जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा धर्माबाद आपले स्वागत करत आहे.